गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा ता. पवनी जि . भंडारा अंतर्गत चालणारी गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महा विद्यालय सावरला ता. पवनी जि . भंडारा या विद्यालयाची स्थापना जुलै १९८४ ला झाली. तेव्हा विद्यालयाची स्थापना करताना प्रबंध संस्थापक स्व. तुकारामजी मोटघरे साहेबांच्या उद्देश हा ग्रामीण व जंगल व्याप्त परिसरातील विद्यार्थांनी शिक्षणाचे प्रवाहात यावेत व त्याने शिक्षण घेता यावेत हा होता.
तसेच आज आमचे संस्था अध्यक्ष साहेब मा. ऍड आनंदजी जिभकाटे यांनी मोठा उद्देश ठेवला आहे कि ग्रामीण विद्यार्थी देखील शहरी विद्यार्थ्या प्रमाणे मोठी झाली पाहिजे उच्च विद्या विभूषित झाली पाहिजे त्या साठी त्यांनी २००९ -१० या सत्र पासून सावरला येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले.
सध्या विद्यार्थंची भौतिक सुविधांनी पूर्ण भव्य इमारत उभारली गेली या संगणकापासून प्रोजेक्टर पर्यंत सर्व साधन आहेत. त्याच बरोबर विद्यार्थाना शिकवण्यासाठी शिक्षक हि तेवढेच उच्च शिक्षित आहे ते विद्यार्थ्यां साठी ते विद्यालयात वेगवेगळी उपक्रम राबवितात यात क्रीडा, सांस्कृतिक , विज्ञान आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. विद्यालयात थोर पुरुषांचे जयंती आणि पुण्यतिथी यांनाहि प्राधान्याने साजऱ्या केल्या जातात. त्यात विद्यार्थानाच प्राधान्य दिले जाते . सोबतच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने शालेय परीक्षा व्यतिरिक्त शाळा बाह्य परीक्षेचे आयोजन केले जाते त्या साठी विद्यार्थाना योग्य मार्गदर्शन केले जातेविद्यालयात सहली सारखे उपक्रम राबविले जातात तसेच आसपासच्या परिसर निसर्ग रम्य असल्याने वन विभागेचें उपक्रम राबविले जातात.
-प्राचार्य
- श्री.जी.जी. सलामे